आमचा शिक्षक, आमचा अभिमान!
शहराकडे लोंढे शिक्षणासाठी.....! सुजाण पालकांनो आता तरी लक्ष द्या! आपल्या पाल्याला शिकवण्यासाठी आपल्या गावातील, खेड्यातील, वस्तीतील मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये जगाला ज्ञान देणारे अनमोल रत्न उपस्थित असतांनी आपण शहरातील महागड्या देखाव्या कडे पाहून आपली आर्थिक कुवत नसतानाही, आपल्या पाल्याला महागड्या शाळेतील शिक्षण देण्याकडे आपला जो कल झालेला आहे, तो निश्चितच कुठेतरी थांबवण्याची आणि आपल्या पाल्यांना जगाशी जोडणाऱ्या या ज्ञानवंत गुरुजींच्या सानीध्यात वाढू देण्याची, त्यांच्या ज्ञानात प्रगल्भता आणण्यासाठी आपण विचार करण्याची गरज आलेली आहे.... सोलापूर जिल्हा परिषदेतील शिक्षक #रणजितसिंह_डिसले यांना युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने दिला जाणारा जागतिक स्थरावरील 7 कोटी रुपयांचा ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर झाला. भारताला पहिल्यादाचं हा सन्मान मिळाला आहे. जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून त्यांचा गौरव होणे ही नक्कीच अभिमानास्पद आहे. सोलापुरच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकवणारा आपला शिक्षक जागतिक पातळीवर सन्मानित होतो. यापेक्षा अभिमानाची दुसरी गोष्ट नाही....