Posts

Showing posts from October, 2020

"शिरछेद" होट्टल मंदिर

Image
* आजचे जलरंगातील चित्र-होट्टल मंदिरावरील शिल्प*  कुठलीही कला ही त्या परिसरातील सामाजिक, धार्मिक आणि भौगोलिक परिस्थितीचे ऐतिहासिक महत्त्व स्पष्ट करत आसते, अश्मयुगीन काळापासून हे अनेक पुराव्यावरून स्पष्ट झाले आहे. मंदिरे,गुहाचित्रे, शिल्प ही त्या त्या काळातील विचार प्रणाली आणि दैनंदिन जीवनातील,जगण्याच्या विचार प्रवाहाच्या, सामाजिक नियमांच्या  आधारावर निर्माण झाली असावी यात अनेक मंदिरावरील,गुहातील चित्र-शिल्प या कलाकृती वरुन अंदाज बांधता येतो, मंदिरावरील लैंगिक शिल्प असोत की कठोर नियमांचे पालन करण्यासाठी "वैधानिक" इशारा देण्यात आले असावेत असे वाटते.असेच एक शिल्प महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील चालुक्य घराण्याची उप राजधानी असलेले शिल्प सौंदर्याने नटलेले सिध्देश्वर मंदिर #होट्टल    येथील मंदिरावरील शिरछेद करून मस्तक हातात धारण केलेली स्त्री शिल्प याची साक्ष देते,    स्त्रियांवरील अत्याचाराला स्त्री शिक्षा ठोठावेल असे सुचक शिल्प असावे, पुरुष संस्कृतीत स्त्रीयावर अत्याचार हे पुरुषा कडून होतील तेव्हा त्यांना शासन निर्णय हा स्त्री करेल, भरच...