आमचा शिक्षक, आमचा अभिमान!

शहराकडे लोंढे शिक्षणासाठी.....! 
सुजाण पालकांनो आता तरी लक्ष द्या! आपल्या पाल्याला शिकवण्यासाठी आपल्या गावातील, खेड्यातील, वस्तीतील मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये जगाला ज्ञान देणारे अनमोल रत्न उपस्थित असतांनी आपण शहरातील महागड्या देखाव्या कडे पाहून आपली आर्थिक कुवत नसतानाही, आपल्या पाल्याला महागड्या शाळेतील शिक्षण देण्याकडे आपला जो कल झालेला आहे, तो निश्चितच कुठेतरी थांबवण्याची आणि आपल्या पाल्यांना जगाशी जोडणाऱ्या या ज्ञानवंत गुरुजींच्या सानीध्यात  वाढू देण्याची, त्यांच्या ज्ञानात प्रगल्भता आणण्यासाठी आपण विचार करण्याची गरज आलेली आहे.... 

सोलापूर जिल्हा परिषदेतील शिक्षक #रणजितसिंह_डिसले यांना युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने दिला जाणारा जागतिक स्थरावरील 7 कोटी रुपयांचा ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर झाला. भारताला पहिल्यादाचं हा सन्मान मिळाला आहे. जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून त्यांचा गौरव होणे ही नक्कीच अभिमानास्पद आहे. सोलापुरच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकवणारा आपला शिक्षक जागतिक पातळीवर सन्मानित होतो. यापेक्षा अभिमानाची दुसरी गोष्ट नाही. 
           जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून गौरव, भारताला पहिल्यादाचं मिळाला सन्मान .
युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर प्राईझ आज जाहीर झाला असून सोलापूर च्या परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना 7 कोटी रुपयांचा हा पुरस्कार आज जाहीर झाला .
 लंडन मधील नॅचरल हिस्ट्री म्युझियम मध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी याची अधिकृत घोषणा केली .
    असा पुरस्कार मिळणारे ते पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत .
 जगभरातील 140 देशांतील 12 हजार हुन शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले गुरुजींची घोषणा करण्यात आली आहे . QR कोड अभ्यासक्रमात आणुन एक शैक्षणिक क्रांती घडवून आणली, 
आज, बालभारतीच्या पुस्तकात त्याचा या समावेश केल्यामुळे, आज कोरोना च्या संकटात त्याचा विद्यार्थ्यांना स्वयम् अध्ययनात खुप महत्त्वाचा ठरतो आहे. 
              QR कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रचं नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रांत अभिनवं क्रांती केलेल्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. 
   पुरस्काराच्या एकूण रक्कमेपैकी 50 टक्के रक्कम अंतिम फेरीतील 9 शिक्षकांना देण्याचे रणजीतसिंह डिसले यांनी जाहीर केले असून, यामुळे 9 देशांतील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाईल .
 डिसले गुरुजींना मिळालेली रक्कम ते टीचर इनोव्हेशन फंड करीता वापरणार असून त्यामुळे शिक्षकांमधील नवोपक्रमशिलतेला चालना मिळेल.
या पेक्षा अभिमन नाही.... ! 
आमचा अभिमान तुम्ही.... 
आमचा स्वाभिमानी तुम्ही.... 
डिसले सरांना पुढील वाटचाली साठी
लक्ष लक्ष शुभेच्छा💐💐

Comments

Popular posts from this blog

"शिरछेद" होट्टल मंदिर

*"भाव भक्तीतून समृद्ध झालेला श्री पवित्रेश्वर महादेव मंदिर परिसर"* पोत्रा ता. कळमनुरी जि.हिंगोली (महाराष्ट्र)येथील श्री पवित्रेश्वर महादेव मंदिर अतिशय पुरातन काळापासून निसर्गरम्य परिसर लाभलेल्या डोंगराच्या रांगांच्या कुशीमध्ये स्थापित मंदिर हे भक्ती आणि निसर्ग संवर्धन या साठी सर्वदूर परिचित आहे. श्री पवित्रेश्वराचे लिंग हे स्वयंभू असून पवित्रेश्वराची वालुकामय लिंगाची स्थापना श्रीरामाने वनवासात असताना केलेली आहे असा उल्लेख शिवलीलामृत या ग्रंथात आढळतो. या ठिकाणी वर्षभर धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केल्या जाते या सोहळ्यात गावकऱ्यां सोबतच पंचक्रोशीतील सर्व जाती धर्माचे लोक सहभागी होतात याच बरोबर या ठिकाणी महाराष्ट्राच्या सर सर्व जिल्ह्यातून व आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक ,गुजरात या राज्यातून भाविक दर्शनासाठी येतात पूर्वी या ठिकाणी चुना विटातील अतिशय पुरातन वास्तुकलेचा सुंदर नमुना असलेले शिव मंदिर होते त्याचा काही भाग क्षितीग्रस्त झाल्यामुळे गावकरी व परिसरातील भाविकांनी मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प केला आणि २००४ यावर्षी कामाला सुरुवात होऊन २००७ पर्यंत काम अविरत सुरु होते.काम सुरू असताना अनेक प्रसंगातून ह्या मंदिराचे धार्मिक व वास्तुशास्त्राचे महत्त्व प्रत्यक्षदर्शी भाविकांच्या लक्षात आले आहे. सुंदर घडवलेल्या दगडांमध्ये चौथऱ्या पर्यंतचे बांधकाम वैशिष्ट्यपूर्ण केले आहे, त्या वरील भाग हा विटा आणि सिमेंटचे बांधकाम आहे *"अनेक वर्षापासून धार्मिक भावनेतून महादेव माळावर जपली हिरवळ"* गावकऱ्यांच्या श्रद्धेतून आणि जनजागृतीमुळे 84 एकर माळरानावर पवित्रेश्वराच्या आजूबाजूच्या परिसरात अतिशय सुंदर घनदाट जैवविविधतेने नटलेले हिरवे गर्द जंगल साकारले आहे, पोत्रा येथील श्री प्रवित्रेश्वराच्या निसर्गाने नटलेल्या,एखाद्या चित्रकाराने सुंदर निसर्ग चित्र रेखाटन करावे असा हा गोंगाटापासून दूर आणि प्रदूषण विरहित नैसर्गिक परिसर गावकऱ्यांनी अतिशय जिव्हाळ्याने जपला आहे. महादेव परीसरातील कुठलीही वस्तू ही स्वत:साठी वापराची नाही ती सार्वजनिक आहे अशी धार्मिक भावना लोकांच्या मनात दृढ झाली आहे. माळावर वृक्ष संवर्धनासाठी गावात चराईबंदी, कुऱ्हाडबंदी या कार्याचा समावेश करण्याबरोबरच वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन मोहीम यशस्वी राबवली आहे.त्यासाठी पोळ्याच्या वेळेस गावात प्रत्येक घराच्या दरवाज्यात मेडी म्हणून एक पळसाचे व एक उंबराच्या झाडाची फांदी ठेवण्याची प्रथा होती ती वर्षानुवर्ष चालत आलेली प्रथा पण वृक्षसंवर्धनासाठी ही प्रथा गावातील सामाजिक कार्यकर्ते यांच्या मदतीने बंद करण्यात आली आणि सर्व गावकऱ्यांनी या चांगल्या उपक्रमास सहकार्य केले आहे. त्यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात तोडल्या जाणारे महत्त्वपूर्ण आयुर्वेदिक महत्त्व असलेले पळस आणि उंबर हे वृक्ष संवर्धन झाले आणि त्याचा फायदा लोकांना लक्षात आला आज घडीला महादेव माळावर कडुनिंबाचे तीस ते चाळीस हजार वृक्ष संवर्धना ने वाढले आहेत,कडुनिंबाचे एक सुंदर जंगल तयार झाले आहे, याठिकाणी सागवान, सीताफळ, वड ,शंखपुष्पी, पळस,बोर, बिऱ्हाटी या सारख्या औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत, याशिवाय अनेक लहान-मोठ्या वनस्पतीचे संवर्धन झाले आहे, त्याच बरोबर असंख्य जातीचे रानफुलांच्या वनस्पती आपल्याला पाहायला मिळतील या परिसरात खूप सुंदर जंगलाचे स्वरूप प्राप्त झाले आल्यामुळे हे एक अभयारण्य तयार झाले आहे, या ठिकाणी अनेक प्रकारचे फुलपाखरे तसेच अनेक विस्थापित पक्षांचा स्वच्छंदी वावर पाहायला मिळतो,पक्षांनाही वृक्षामुळे संरक्षण मिळाले आहे अनेक भागांतून स्थलांतरित पक्षी या ठिकाणी येत असतात, "स्वाध्याय परिवाराच्या वतीने श्री पवित्रेश्वराच्या परिसरात ६० पिंपळाची व ६० वडाची रोपटे,रोपट्या मध्ये प्रत्यक्षात राम व वृक्षत वासुदेव असून या झाडांची प्राणप्रतिष्ठा लक्ष्मीनारायण म्हणून दांपत्याच्या हस्ते १२ जुलै हा मानव पर्यावरण आणि देव यांचे नाचे नातेसंबंध सांगणाऱ्या दिवशी करण्यात आली त्याला १९ ऑक्टोबर मनुष्य गौरव दिनापर्यंत म्हणजे शंभर दिवस जलाभिषेक करून संवर्धन केल्या गेली आहे. हे एक पिंपळ वड वन तयार होते आहे काही वर्षांपूर्वी हा संपूर्ण परिसर वन विभागाने जय व संवर्धन करण्यासाठी ताब्यात घेऊन त्यांनी सुद्धा अनेक प्रकारच्या औषधी वनस्पतींची लागवड करुन त्याचे संवर्धन केले आहे ,संपूर्ण परिसराला तार कुंपण केली आहे त्या ठिकाणी नैसर्गिक वातावरणात बसण्यासाठी, पक्षांचे,फुलांचे निरीक्षण करण्यासाठी सुंदर टिनच्या गोल आकारातील असं व्यवस्था केल्या आहेत, जंगलात फिरण्यासाठी सिमेंट रस्ते,उंच ठिकाणी टावरवर बसून पक्षी निरीक्षण,जंगल निरीक्षण करता येईल असा एक मनोरा तयार केला आहे, पाण्याची टाकी आहे, मुलांना मनोरंजनासाठी घसरगुंडी, झोके इत्यादी उपलब्ध करून दिले आहेत, या परिसरात केलेल्या वृक्ष संवर्धनामुळे परिसरातील बोर विहिरी यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झालेली आहे, त्याचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांना होत आहे,वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे ,हे येथील सूज्ञ लोकांच्या लक्षात आले आणि धार्मिकतेचा उपयोग निसर्ग संवर्धनासाठी करता येतो याचे ज्वलंत उदाहरण या स्थळाला भेट दिल्यावर लक्षात येते, आणि तुकाराम महाराजांचा अभंग आठवतो ........ वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें ।पक्षी ही सुस्वरें आळविती ।।येणें सुखें रुचे एकांताचा वास ।नाही गुण दोष अंगा येत ।। भक्ती ही धार्मिकतेतून वैचारिक आणि डोळस भक्तीकडे असली तर त्याचा खूप मोठा लाभ समाजाला होतो हे इथे लक्षात येते, हा परिसर ऑगस्ट ते जानेवारी पर्यंत खूप हिरवागार असतो. श्री पवित्र ईश्वराचा हा परिसर भक्तिमय आहे येथे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दरवर्षी हजारो भाविक भक्त येतातच. शाळेच्या निसर्ग सहली येथे येत असतात, या वर्षी कोरोना च्या प्रादुर्भावामुळे वार्षिक यात्रा मोहोत्सव सारख्या मोठ्या कार्यक्रमा पासून ते साधारण कुठलाही कार्यक्रम अतिशय साधारण पध्दतीने पार पडला आहे सध्या सर्व नियमांचे पालन करूनच भाविकांना दर्शनाचा लाभ मिळत आहे. मंदिर आणि सभामंडपाचे संपूर्ण बांधकाम हे लोकांच्या धार्मिकतेतून लोकवर्गणीतून साकारले आहे आणि श्री पवित्रेश्वर मंदिर हे तिर्थक्षेत्र समाविष्ट केला गेला असल्यामुळे या ठिकाणी स्वरक्षण भिंत,स्वच्छतागृह वाहन तळ, धर्मशाळा,लाईट व्यवस्था , वर जाण्याचा मार्ग, पिण्याचे पाणी, धर्मशाळा हे लोक प्रतिनिधी व तिर्थक्षेत्र विकास निधीतून विकास कामे केली आहेत. ......... ......... ........... श्री पवित्रेश्वर मंदिरातील पिंड ही स्वयंभू असून या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प परिसरातील भाविक भक्त व गावकऱ्यांनी २००४ साली घेतला होता आणि तो २००७ पर्यंत काम पूर्ण झाले, काम करत असतांना मंदिरातील मुख्य लिंग बाजुला करण्याचा प्रयत्न करण्यासाठी बाजूने 15 फूट खोलीपर्यंत खोदकाम केले तरी लिंगाचा अंत लागला नाही, असे हे अदभुत वालुकामय पवित्रेश्वर लिंग श्री रामा यांनी स्थापना केले आहे असा उल्लेख शिवलीलामृत या ग्रंथात आढळतो. श्री पवित्रेश्वराचा हा नयनरम्य परिसर, जोपासलेली वनराई धार्मिक मनःशांती व उंचावरून वाहणारे वारे भरपूर ऑक्सिजन यामुळे मन प्रसन्न होते, चित्रकार ,कवी ,लेखक ,पक्षी अभ्यासक, निसर्गप्रेमी, विद्यार्थी यांच्यासाठी अतिशय शांतप्रिय परिसर आहे, तासनतास येथे येऊन बसले तर आरोग्याला खूप फायदा होतो आणि मनाला शांतीचा साक्षात्कार होतो. (चित्रकार-दिलीप दारव्हेकर)